अक्कलकोट : सध्या अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असून यात गोर गरीब जनतेच्या संसार उधवस्त करण्याचे काम चालू असून ही मोहीम तात्काळ थांबवा अन्यथा रिपाई स्टाईलने आंदोलन करू असा इशारा रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला आहे.
अक्कलकोट शहरात गेल्या आठ दिवसापासून नगरपरिषदे मार्फत अतिक्रमण काढण्यात येत आसून यात नगरसेवक व काही धन दांडग्यांना सवलत देऊन गोर गरिबांचे संसार चालणाऱ्या व्यवसायावर गदा अनुन उधवस्त करत आहेत गेली अनेक वर्ष अक्कलकोट शहरात कोणतेही मोठे औद्योगिक क्षेत्र नसून मोठ्या प्रमाणात नौकरी उपलब्ध नाही अश्यात शिकलेली तरुण बेरोजगार म्हणुन छोटे मोठे व्यवसाय करून अपला संसाराचा गाडा चालवत असतात तरी नुकतेच दोन वर्ष कोविड मुळे लोकांचे जगणे बेहाल झाले होते त्यात अनेकाने घरचा कर्ता करविता गमावला हे सर्व असताना हे अतिक्रमण काढून नगरपरिषद हे काय करत आहे असा सवाल यावेळी मडी्खांबे यांनी केला आहे.
अतिक्रमण न थांबवल्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन अधिकरिना भेटून यांच्याशी संपर्क साधून अतिक्रण थांबवण्याचा विनंती करणार असल्याची माहिती अविनाश मडिखांबे यांनी सांगितले.