ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांच्यासह एकूण बारा जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसानी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले गेले. आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
जामीन मिळाला …
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2022
Watch Our Latest Video
काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते!#चाणक्य ची नीती फसली
जामीन जेवण दोन्ही मिळाले— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2022








