मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची एकीकडे धामधूम सुरू असताना महामुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फौंडेशनसह उखडून कोसळले. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला तर ६९ जण जखमी झाले.
होर्डिंग आणि पेट्रोल पंपाच्या पत्र्याखाली वाहने विचित्र पद्धतीने दाबली गेल्याने बचाव कार्य करणे आव्हानात्मक झाले होते. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने बचाव मोहीम राबवित पत्र्याखालून अनेकांना बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी होर्डिंग कंपनीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पंतनगर पोलिस ठाण्यात गन्दा दाखल करण्यात आला.
धोकादायक होर्डिंग लगेच काढा : मुख्यमंत्री
घाटकोपर इथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशा प्रकारचे होर्डिंग किवा कुठलेही बांधकाम पडू शकते, त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाचे प्रमख व मख्य सचिवांना दिल्या.