विद्यार्थी गुणवत्तेसोबतच शाळा समृद्धीसाठी प्रयत्नशील : अरबाळे
मोट्याळ येथे डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या शाळेप्रती असलेल्या उत्तरदायित्वच्या भावनेतून शाळांच्या विकासासोबतच स्पर्धात्मक वातावरणातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरण निर्मितीसाठी मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा अभियान दिशादर्शक ठरेल.विद्यार्थी गुणवत्तावाढीसोबतच शाळांच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी केले.मोट्याळ शाळेच्या स्नेहसंमेलन उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सरपंच कार्तिक पाटील यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.विद्यार्थी आणि शाळा विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासोबतच शाळा विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन सरपंच पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी दयानंद कवडे,केंद्रप्रमुख जीवराज खोबरे,ग्रामसेवक एस.पी.घुगरे,उपसरपंच हालीमा फुलारी,ग्राम पंचायत सदस्य आप्पाराव साळुंके,विजय गेजगे,निर्मला सुतार,सोनाली सुरवसे,स्वप्नील सपकाळ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यंकट पाटील,देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनकर काळे,जिलानी जमादार,रऊफ मुल्ला,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जैनोद्दीन मुल्ला,मनीषा सुरवसे,सुमित्रा सुरवसे आदी उपस्थित होते.यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,लोकनृत्य,शेतकरी गीते,भारुड,समाजप्रबोधनपर नाटिका,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नृत्य,ऐतिहासिक शौर्य गीते,वात्रटिका आदी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.देशभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दयानंद चव्हाण, उपशिक्षिका नयना भोसले,काशिनाथ बंडगर,अशोक घोगरे,शशिकांत परिक्षाळे,अविनाश मोरे,दत्तात्रय गरड, खंडेराव रोंगे,पंडित मोरे,उंबर मुल्ला,अकिल जमादार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख जीवराज खोबरे यांनी तर सूत्रसंचालन अविनाश मोरे यांनी केले. यावेळी माता-पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.