ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांचे कर्ज !

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना

सोलापूर : प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी,मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गोराडी,मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात येणार असून, देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख रुपये तर परदेशांतर्गत शिक्षणासाठी रक्कम ४० लाख रुपये इतके शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक‍ आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.

एन. एस. एफ. डी. सी. दिल्ली महामंडळामार्फत येत असलेल्या शैक्षणिक कर्ज योजना सन २०२३-२४ पुर्ववत सुरु झाली आहे. या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी ३० लाख रुपये व परदेशांतर्गत शिक्षणासाठी ४० लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शिफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थीनिहाय निधी एन.एस.एफ.डी.सी. कडून उपलब्ध करुन देण्यात येतो. देशांतर्गत व परदेशांतर्गत शिक्षणासाठी तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर महिला लाभार्थ्यांसाठी ५.५ टक्के व पुरुष लाभार्थ्यांसाठी ६ टक्के व्याजदर आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी महिला लाभार्थ्यांसाठी ६.५ टक्के व पुरुष लाभार्थ्यांसाठी ७ टक्के व्याजदर आहे. १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परतफेडीचा कालावधी १० वर्षाचा व १० लाख रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज परतफेडीचा कालावधी १२ वर्षांचा असेल. कर्ज परतफेडीची सुरुवात शिक्षण पुर्ण होऊन ६ महिन्यानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर यापैकी जे अगोदर होईल तेव्हापासून सुरुवात होईल.

अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, दुसरा मजला, सात रस्ता येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.चव्हाण यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!