---Advertisement---

शब्द देण्यापूर्वी माहिती जमा करा ; वाचा राशिभविष्य !

By team
On: December 22, 2023 9:07 AM
Follow Us:
---Advertisement---

मेष : अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. अनुभवातून काहीतरी शिका. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. वैवाहिक आयुष्यात थोडी मोकळीक हवी असेल.

वृषभ : आर्थिक लाभ होतील. जवळच्या मित्रांचे आणि जोडीदारांचे आक्षेपार्ह कृत्य तुमचे आयुष्य खडतर करु शकते. व्यवसायात कोणताही शब्द देण्यापूर्वी महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.

मिथुन : आर्थिक आघाडीवरील सुधारणा. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक विचारसरणीमुळे तुमचे कौतुक होईल.

कर्क : भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. खर्चावर नियंत्रण मिळवा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. कामाला आज दाद मिळेल. जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

सिंह : बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. सावधनता बाळगा, कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करु शकते. जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल.

कन्या : दान-धर्म कराल. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.

तूळ : आर्थिक बचत कराल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.

वृश्चिक : आर्थिक लाभ होईल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदल करण्यास सहकाऱ्यांचा पाठींबा लाभेल.

धनु : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. जोडीदारासमवेत आयुष्यातील एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मकर : आर्थिक बचत करा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काळ अतिशय योग्य. जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल.

कुंभ : आर्थिक चणचण जाणवेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुम्हाला जाणीव होईल की जोडीदार हा खरंच सोलमेट आहे.

मीन : खर्चांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!