ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सोलापूर ते वळसंग सायकल प्रवास करून दिला जलसाक्षरता व पर्यावरण जागृतीचा संदेश

अक्कलकोट, दि. ३ : ड्रीम फौंडेशन व श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या तर्फे पर्यावरण संवर्धन व जलसाक्षरता जागृती साठी रविवारी सायकल रॅली काढण्यात आली. सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा ते समर्थ तलाव वळसंग असा २५ किमी सायकल प्रवास पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात सायकल प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटे, संपूर्ण भारत सायकल प्रवासी काशिनाथ भतगुणकी यांनी सहभाग घेतला होता.

जल है ,तो कल है,पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश रॅलीत देण्यात आला. सकाळी ७ ते १० या वेळेत अकरा जणांनी सहभागी होऊन २५ किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला. चार हुतात्मा, डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा शुभारंभ झाला.

प्रवासात रंगभवन, पाणी टाकी, कुंभारी, लिंबी चिंचोळी मार्गे वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ येथे समारोप झाला.  या रॅलीत ड्रीम फौंडेशन व चाणक्य गुरुकुलमधील अमृता माने, अमोल गोगावे ,मा, शाहीर रमेश खाडे, कुंभारीचे धीरज चपेकर, शुभम यंगाली, लुकेश कडू, विशाल यंगाली, डॉ. प्रकाश घटोळे
आदी सहभागी झाले होते.

वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ येथे वृक्षारोपण, जल पूजन झाले आणि गावातील लोकांना जल साक्षरता जागर यावर डॉ. श्रीनिवास वडकबाळकर, विठ्ठल माने, चिंचोळकर, काळे सर यांचे मार्गदर्शन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!