ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग..! गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील झुलता पूल कोसळला, ३२ जणांचा मृत्यू बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू

गुजरात: गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल संध्याकाळी ६.३० दरम्यान कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळला तेव्हा सुमारे चारशेहून अधिक लोक त्यावर होते, असे सांगण्यात आले. चारच दिवसापूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली होती अन्घi याच वेळी हा झुलता पूल तुटला. सध्या घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जेव्हा घटना घडली पंधरा मिनिटात बचाव पथके घटना स्थळी पोहोचले, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.

(सूचना : सदर व्हिडिओ झुलता पूल तुटण्या पूर्वीचा आहे असे सांगतले जात आहे मात्र हा व्हिडिओ कालच आहे👇🏼)

 

अपघाताचे माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली आहे, असे गुजरातचे गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी  सांगितले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवून आहेत. बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहेत असेही गुजरात सरकारकडून माहिती देण्यात आले आहे.

 

 

मोरबी झुलता पूल हा अनेक वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक पूल होता. दुरुस्ती आणि जीर्णोद्धार केल्यानंतर, गुजराती नववर्षानिमित्त २६ ऑक्टोबर रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!