ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ साखर कारखान्यासाठी शांततेत २९.१७ टक्के मतदान; १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद,उद्या निकाल

 

अक्कलकोट, दि.१६: येथील बहुचर्चित श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत केवळ २९.१७ मतदान झाले.मतमोजणी उद्या ( सोमवारी ) केली जाणार आहे.या निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सर्वत्र शांततेत मतदान झाले परंतु
मतदान कमी झाल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.या निवडणुकीमध्ये यापूर्वीच माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे १३ उमेदवार
हे बिनविरोध झाले आहेत.त्यामुळे सहा जागांसाठी ही निवडणूक लागली होती.दोन जागा ह्या रिक्त आहेत.या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी निवडणूक लढविली होती.स्वामी समर्थ कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर हे देखील निवडणूक रिंगणात होते.तालुक्यातील ४८ मतदान केंद्रावर एकूण मतदान २० हजार ५५५ पैकी केवळ ६ हजार १० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वात कमी मतदान किणी केंद्रावर ५१५ पैकी केवळ ३५ मतदान तर सर्वाधिक मतदान हे सुलेरजवळगे केंद्रावर ४०० पैकी २७५ इतके झाले आहे.
या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षापासून
माजी आमदार पाटील यांची सत्ता आहे.त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न बचाव पॅनेलने केला आहे.पाटील पॅनलच्या विजयासाठी माजी आमदार पाटील, आमदार कल्याणशेट्टी यांच्यासह ज्येष्ठ नेते स्वामीराव पाटील, बसलिंगप्पा खेडगी, अप्पासाहेब पाटील, विश्वनाथ भरमशेट्टी आदींनी प्रयत्न केले
तर कारखाना बचाव पॅनलकडून शिवसेना तालुका प्रमुख देशमुख, सुनिल बंडगर, माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा,विनोद मदने,प्रशांत गुरव,प्रकाश दुपारगुडे आदींनी प्रयत्न केले. मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.यासाठी उपविभाग अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी,पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी विशेष लक्ष ठेवले होते.

 

सर्व मतदान केंद्रावर
संथगतीने मतदान

मतदानाला सकाळी आठपासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला.संथगतीने सर्वच केंद्रावर मतदान झाले.या अगोदर ऊस उत्पादक गटातून तेरा जण बिनविरोध झाल्याने निवडणूकीतील चुरस संपली त्यामुळे कदाचित मतदानाची टक्केवारी घटली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!