सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूरमधील संतोषनगर, शांतीनगर व शिवगंगानगर येथील ज्योती चव्हाण गोल्डन ग्रुप व तेजस्विनी फिटनेस सेंटरच्यावतीने आयोजित गरबा कार्यक्रमात तेजस्विनी फिटनेस सेंटरने प्रथम क्रमांकाचे एक ग्रॅम सोन्याचे गंठण पटकावले.
जामगोंडी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल एक हजार महिलांचा सहभाग होता. ए. जी. पाटील इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, उद्योजक रमेश पाटील, मंडळाच्या आधारस्तंभ मंगल शटकार पाटील, सुनंदा प्रचंडे, मेघाताई पाटील, सचिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमास सुरवात झाली यावेळी राजशेखर पाटील, अशोक भांजे, गंगाधर पाटील आदी उपस्थित होते.
गरबामध्ये प्रथम क्रमांक विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याचे गंठण बक्षीस देण्यात आले. अन्य बक्षिसात पैठणी व चांदीच्या वस्तू देण्यात आल्या. कल्याणी इमिटेशन ज्वेलरीने बक्षिसांचे प्रायोजक होते. तेजस्विनी फिटनेस ग्रुपने बहारदार नृत्य सादर केले.
या स्पर्धेत महानंदा ईश्वर स्वामी, कुसुम गायकवाड, चंद्रकला मंगळवेळकर, मनीषा नलावडे, सपना जाधव, रुक्मिणी नाईक, पद्मा जिरगे, विद्या महागावकर आदींसह महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.