‘जय हिंद शुगर’च्या तत्परतेमुळे आग विजून दहा एकर ऊस वाचले! इंगळगीत उसाच्या फडाला लागले होते आग; मोठे नुकसान टळले
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील रखमाजी वंजारे यांच्या शेतातील उसाच्या फडाला सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे रौद्ररूप पाहून तात्काळ जवळीलच आचेगाव येथील जय हिंद शुगर फॅक्टरीमधील अग्निशामन दलाशी संपर्क साधून गाडी मागविण्यात आले. अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फवाऱ्याने आग आटोक्यात आणून दहा एकर ऊस वाचविण्यात यश आले.
सोमवारी, सकाळी इंगळगी येथील रखमाजी वंजारे हे शेतातून गावात आल्यानंतर उसाच्या फडाला अचानक आग लागल्याचे समजले. त्यामुळे तात्काळ आजूबाजूचे शेतकरी जमा झाले व आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी जय हिंद शुगर फॅक्टरीशी संपर्क साधला. त्यामुळे तात्काळ सायरन वाजवीत जय हिंद शुगरची अग्निशमन गाडी फडात आली. यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्यात यश मिळवले. त्यामुळे आजूबाजूतील दहा एकर ऊस जळण्यापासून वाचले. जय हिंद शुगर फॅक्टरीचे चेअरमन गणेश माने-देशमुख, उपाध्यक्ष विक्रमसिंह पाटील आदींचे सहकार्य लाभले.
याचबरोबर लोडशेडिंगमुळे वीज नव्हती. पाणी पुरवठा करण्यासाठी महावितरणलाही संपर्क साधल्यानंतर तात्काळ वीज सोडली, त्यामुळेही मदत झाली. लाईट वायरमन संजय बहिर्जे यांचेही सहकार्य लाभले. जेसीबी चालक राम निकम यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला.
एक एकर उसाचे झाले नुकसान
इंगळगी येथील रखमाजी आमसिद्ध वंजारे यांच्या शेतातील उसाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. यावेळी एक एकरवरील ऊस जळून सुमारे 50 टनाचे नुकसान झाले आहे. तलाठी दीपिका ठाकूर व कोतवाल दत्ता कदम यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. जय हिंद शुगरच्या अग्निशमन गाडीमुळे आग लवकर विजण्यात आले. तात्काळ पाण्याचा फवारा केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा आजूबाजूतील सुमारे दहा एकरवरील ऊस जळून खाक झाले असते.