---Advertisement---

शिवसेना (ठाकरे) गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव; अनिल परब आक्रमक !

By team
On: November 14, 2025 5:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

ताज लँड्स एण्ड हॉटेलबाहेर गुरुवारी शिवसेना (ठाकरे) गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाल्याची घटना घडली. भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजप प्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात सामील केल्याचा आरोप ठाकरे गटाने केल्यानंतर हे वादंग उफाळून आले. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब स्वतः हॉटेलबाहेर दाखल झाले होते.

हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी परब येताच पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. “मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाही,” असे सांगत परब यांनी पोलिसांनाच जाब विचारला. माझ्यासोबत किमान २५ कार्यकर्ते आत यायला हवेत, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. “सत्तेत आहेत म्हणून इतका माज?” असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. या वादातून काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

भारतीय कामगार सेनेच्या कामगारांच्या सह्या फसवून भाजपकडून अखिल भारतीय कर्मचारी संघाची सदस्य नोंदणी केल्याचा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला. चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाच्या कामगारांची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हॉटेल परिसरातील या राड्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गर्दी पांगवली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!