मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील उमेदवारांचे अर्ज भरण्याचे काम सुरु झाले असून तर उद्धव ठाकरे गटाचे नेते देखील आता राज्यभर भाजपच्या विरोधकात जोरदार प्रचार करीत आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील थेट राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजपच्या वतीने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला जातोय. याला देखील आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर 800 जागा मिळणार असल्याचे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. मिंदे सरकार मुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने अब की बार 400 पारचा नारा दिला जात आहे. मात्र, या वेळी ते 200 पार देखील जाणार नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील ह्यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होत. या नंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला.
पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या वतीने हिंदू – मुस्लिम विषय काढला जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना आपला परभव दिसून आला आहे. त्यामळेच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू – मुस्लिम मुद्दा पुढे केला असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आता सध्या हिंदू मुस्लिम या विषयावर भाजपचा प्रचार सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारवर केलेल्या आरोपाला देखील आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपला आपला पराभव दिसत असल्यामुळे ते हिंदू – मुस्लिम विषयावर प्रचार करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.