ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संविधान खरेच खतरे में है, ; केंद्र सरकारवर सावंतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेते महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतांना आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले कि, संविधान खरेच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचे राज्य नाही, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. नाशिक येथे शनिवारी भगवान महावीर जनकल्याण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर भाष्य केले.

अरविंद सावंत म्हणाले, संसदेत पूर्वी विरोधकांना पण ऐकले जात होते. तेव्हा प्रसिद्धी माध्यमे वेगळी होती. दूरदर्शन आले आणि क्रांती झाली. नवनवे प्रसिद्धी माध्यमे आली आणि त्यानंतर लोकशाहीचे प्रश्न निर्माण झाले. मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले, तेव्हा वाटले लोकशाहीचा आता सन्मान होईल. एक रेल्वे अपघात झाला तर लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, मात्र इथे तर रेल्वेचे एवढे अपघात झाले, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, संविधान खरच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचे राज्य नाही. मुंबईतली बिल्डिंग कोसळी तरी चर्चा झाली नाही, कुंभमेळ्यात एवढी लोक गेली त्याचे काय झाले? आम्हाला तर 30 चाच आकडा सांगितला होता. आम्हाला सभागृहात चर्चा करू दिली नाही. 2014 पूर्वी जीएसटीला कोणी विरोध केला? आधार कार्डला कोणी विरोध केला होता? जेव्हा रुपयामध्ये घसरण सुरू होती, तेव्हा हे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काय बोलले होते? कायदा करतात त्यातून न्याय द्यायचा आहे की त्रास?, असा सवाल सावंत यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा का आणला? त्यानुसार दोन तृतीयांश सदस्यांना पक्षांतर करता येते, असा नियम बनवला आहे. मात्र हे दोन तृतीयांश कुठे गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, तिथे कोणाचे राज्य आहे? असा सवालही सावंत यांनी विचारला. भाजपमध्ये आता छोट्या मनाची माणसे आहेत. आता देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे, असा भ्रष्टाचार करतात की समजत पण नाही, अशी टीका देखील अरविंद सावंत यांनी यावेळी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group