ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सामूहिक विवाह सोहळ्यावरचा खर्च कोरोना रुग्णांसाठी ही बाब कौतुकास्पद ; आमदार कल्याणशेट्टी यांचे देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

अक्कलकोट,दि.१९ : सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी होणारे खर्च कोरोना काळात वाचाला आहे. पण याचा उपयोग अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले १०० ऑक्सिजन बेडची सुविधा गरीब रुग्णांसाठी एक वरदान ठरेल.ज्यातून सध्या तुमच्या सर्वांचे सुरू असलेले प्रामाणिक प्रयत्न व डॉक्टरांची मेहनत फळास येऊन चांगली रुग्णसेवा घडेल,असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या डेडिकेटेड हेल्थ सेन्टरच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.

फेसबुक लाईव्हने झालेल्या लोकार्पण प्रसंगी सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार अंजली मरोड, डॉ. अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे, डॉ. निखील क्षीरसागर, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, यशवंत धोंगडे, राजेंद्र बंदिछोडे, अप्पासाहेब बिराजदार, महेश हिंडोळे, अतुल कोकाटे, मिलन कल्याणशेट्टी, उत्तम गायकवाड, जितेंद्र यारोळे, अविनाश मडिखांबे, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, विनोद मोरे, प्रदिप पाटील, छोटू पवार, बंटी राठोड, ऋषि लोणारी, शिवशंकर स्वामी, राहूल वाडे, संकेत कुलकर्णी, राहूल ढोबळे, नितीन पाटील, शिवलाल राठोड, संजय राठोड, महेश भोरे, अतिष पवार, नन्नू कोरबू, अकुंश चौगुले यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

पुढे फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोनाच्या प्रकोप अक्कलकोटसह महाराष्ट्रात जास्त आहे.तरीही औषधे व उपकरणे सोलापूरला पुरविण्यात दुजाभाव होतो आहे हे बरोबर नाही.यातूनही संघर्ष करीत आपण मार्ग काढीत आहात त्यामुळे या ठिकाणी सूरु झालेल्या 90 ऑक्सिजन तसेच 10 बायपॅप बेडची सुविधा ही अत्यावश्यक होती आणि ही सुविधा जनसामान्यांना एक वरदान ठरेल आणि या काळात त्यांना पुढे सोलापूरला उपचारास जाण्याची जास्त गरज भासणार नाही.आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिलेला सेवा हीच संघटन हा मूलमंत्र अंगीकारत देशभरात प्रत्येक भाजपा कार्यकर्ता जमेल त्या पद्धतीने आपला खारीचा वाटा उचलत कोरोना काळात मदतीची भूमिका घेत आहे आणि निश्चितच उल्लेखनीय आहे.

दरम्यान आमदार कल्याणशेट्टी यांनी ही डीसीएचसी केंद्र उभारण्याची निर्माण झालेली गरज त्यासाठी आलेल्या अनंत अडचणी आणि त्यातून काढण्यात आलेला मार्ग तसेच प्रशासन व वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले योगदान याचा उल्लेख केला. आणि आभासी पद्धतीने लोकार्पण करून मार्गदर्शन करण्याची फडणवीस यांना विनंती केली.

आजच्या या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या कोरोना उपचारासाठी 10 बायपॅपसह 100 ऑक्सिजन बेड सुविधा ही अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!