अक्कलकोट,दि.१९ ( प्रतिनिधी)- अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात करून आज परत जनसेवेत रुजू झाल्याबद्दल रिपाई आठवले गटाच्या वतीने त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक महिन्या पासुन जगावर सुरू असलेल्या महाभयंकर अश्या कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन रुग्णालयास येणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील जनतेचे कोणतीही वैदकीय समस्या ही कळकळीने सोडवुन त्यांना धीर देतात अश्या योध्याला कोरोना सोबत लढताना त्यांना स्वतःला कोरोनाने हेरले होते पण आज ते यशस्वी रित्या कोरोना वर मात करुन परत जनसेवेत रुजे झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले .
यावेळी वैदकीय अधिकारी नीरज जाधव, सतीश बिराजदार,रिपाई शहर अध्यक्ष प्रसाद माने,रिपाई शहर उपाध्यक्ष रोमित मडिखांबे संगीता कोकणे, सुप्रिया पवार पुजा पाटील,प्रणेश बनसोडे,लक्ष्मीपुत्र मडिखांबे,योगेश मडिखांबे,राजेश साळे व अन्य उपस्थित होते










