नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळे देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेला आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचा प्रत्येकाला पश्चात्ताप होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीत सांगितले.
गुन्हेगारी कारवायांतील काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली, असे मोदी म्हणाले.
‘स्वदेशात उत्पादनावर भर’ इलॉन मस्क यांच्याकडून भारतात गुंतवणूक होण्याच्या शक्यतेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो. पण, स्वदेशात उत्पादने तयार करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे. मनी लाँडरिंगची प्रकरणे दाखल झाल्यानंतर १६ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली. त्यातील ६३ टक्के रक्कम ही अन्य पक्षांना मिळाली. विरोधी पक्षांना देणग्या मिळाव्या म्हणून भाजप प्रयत्न करेल का? असा सवालही मोदी यांनी विचारला.