---Advertisement---

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी पकडले

By team
On: April 16, 2024 9:00 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून सोमवारी (ता. १५) रात्री दोन आरोपींना अटक केली आहे. लवकरच त्यांना मुंबईत आणले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की साहब गुप्ता (वय २४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील रहिवासी आहेत. याच आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रविवार १४ एप्रिलच्या पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रेतील घराबाहेर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी अवघ्या ७ सेकंदात सलमानच्या घरावर ४ गोळी झाडल्या होत्या. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले होती. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तसेच आरोपींच्या शोधासाठी २० वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!