सोलापुरातील भाजी विक्रेत्याची मुलगी युपीएसीत चमकली !
बंजारा समाजाची मुलगी स्वाती राठोड यूपीएससी परीक्षेत भरभराटीचे मिळाले यश
सोलापूर : प्रतिनिधी
स्वाती मोहन राठोड (रहाणार सोलापूर) ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी,हुशार व होतकरू असल्याने, कबाड कष्ट करून,भाजी विकून,आई वडिलांनी तिला शिकवले, स्वातीने आपल्या घराची परिस्थितीची व आई वडिलांची मेहनत याची जाणीव ठेऊन रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखविले.स्वातीचे नातेवाईक राजू चव्हाण महानगरपालिकेत कामाला असून त्यांनी सुद्धा स्वातीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळी यांना दिले आहे. स्वातीच्या यशाने शुभेच्छांचा वर्षाव सर्व समाजबांधवांकडून व मित्रमंडळी कडून होत आहे.