ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अभियंत्याने घेतली २ हजाराचा लाच ; अधिकारी अटकेत !

पंढरपूर : वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता यास २ हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले आहे. साईनाथ नामदेव सनगर (४०) रा. शिवपार्वती नगर, कराड नाका जवळ, पंढरपूर असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विद्युत ठेकेदार असून इंडस टॉवर प्रा. लि. या कंपनीकडून त्यांना नेमतवाडी (ता. पंढरपूर) येथे एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत कनेक्शन करिता महावितरणची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी म.रा. वि.वि. कंपनी पंढरपूर ग्रामीण २ येथे अर्ज केला आहे. सदर अर्जावरून इस्टिमेट तयार करून पुढील कार्यवाही करिता उपअभियंता यांच्याकडे सादर करण्याकरिता कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर यांनी २ हजार रूपयांची लाच स्विकारली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोकसेवक सनगर यास रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार अतुल घाडगे, पोकॉ सलिम मुल्ला यांच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!