अक्कलकोट, दि.१ : आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दूरगामी परिणामकारक तरतुदी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि शेती क्षेत्रात भरीव निधीची तरतूद केली आहे, साहजिकच रोजगाराची उपलब्धी होण्यात मदत होणार आहे,असे अक्कलकोट येथील प्रसिद्ध सी ए ओंकारेश्वर उटगे यांनी सांगितले.
परिणामी कोरोना मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या जनतेच्या खिशात पैसा येईल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात रसायन रहित शेतीला प्राधान्य दिल्याने मानवी आरोग्य संतुलित राहणार आहे.
जे काही उद्योजक सेंद्रिय शेती पूरक व्यवसाय करतील त्यांना नाबार्ड अंतर्गत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. एकंदरीत पाहता सदर अर्थसंकल्प हा तात्काळ परिणामी नसला तरी याचा परिणाम हा दूरगामी आहे असंच म्हणावं लागेल, असे उटगे यांनी म्हटले आहे.