ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी राज्यातील नेत्याचे नाव चर्चेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाला अपेक्षेसारखे यश आले नसल्याचे दिसून आले आहे. तर यंदा चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीपर्यंत जे.पी.नड्डा यांच्याकडेच अध्यक्षपदाची सूत्रे ठेवू शकते. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा व जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीला आणखी सहा महिन्यांचा कालावधी आहे. नड्डा सध्या केंद्रीय मंत्रीही आहेत. त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी एखाद्या सरचिटणीस व्यक्तीकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवले जाऊ शकते. त्यात सुनील बन्सल व विनोद तावडे यांची नावे आघाडीवर आहेत.

नड्डा यांचा कार्यकाळ याच वर्षी जानेवारीत संपला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जून महिन्यापर्यंत त्यांना सेवा विस्तार देण्यात आला होता. जुलैमध्ये नवीन अध्यक्ष निवड होती. परंतु नवीन अध्यक्ष निवडीच्या आधी संघटनात्मक निवडणूक गरजेची असते. त्यासाठीच सहा महिन्यांचा कार्यकाळ लागेल, असे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे मिळालेल्या नेत्याकडे नंतर अध्यक्ष पदाची पूर्णकालीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. त्यामुळे नवीन अध्यक्ष ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ ची बिहार, २०२६ ची प. बंगाल व २०२७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपली टीम पुरेशा वेळेत तयार करू शकेल. २०२८ मध्ये नवीन निवड होईल. तेव्हा २०२९ च्या लोकसभेसाठी त्या अध्यक्षाला दीड वर्षांचा कालावधी मिळू शकेल. अर्थात या काळात तो लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक ती संघटनात्मक तयारी करू शकेल. नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संघटनात्मक पातळीवर पक्ष बळकट झाला. त्याशिवाय पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याची संधीही मिळाली. त्यांचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात संघासंबंधीच्या वक्तव्यावरून वादात सापडला. त्यांच्याकडे आरोग्यमंत्रिपद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!