ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान देणारी ज्ञानोत्री ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

अक्कलकोट : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना सर्वंकष ज्ञान मिळावे या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे अखंड ज्ञानसाधनेची ज्ञानोत्री आहे. त्यातून विद्यार्थ्याची ज्ञानसाधना परिपूर्ण होणार आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले..

महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा डॉ बाळासाहेब पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविद्यालयात विद्यार्थी दशेत अध्ययन करताना शिक्षकाकडून घेतलेले ज्ञान आयुष्याच्या वाटचालीत उपयोगी पडते. विद्यार्थी परिपूर्ण झाला पाहिजे, त्याला विज्ञान वाणिज्य तसेच कला क्षेत्रातील प्रत्येक विषयाचे ज्ञान असले पाहिजे, या हेतूने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी सर्वंकष ज्ञान मिळवण्यासाठी या धोरणाचा फायदा करून घेतला पाहिजे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले. संसाधन व्यक्ती म्हणून प्रा हर्षदा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रा डॉ शितल भस्मे यांनी केले. तर आभार प्रबोधिनी चे चेअरमन प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रा राजेश पवार भीम सोनकांबळे प्रा मनीषा शिंदे प्रा मधुबाला लोणारी आदी शिक्षक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!