ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काय म्हंटले आहेत वाचा सविस्तर

मुंबई : माध्यमिक शालांत परीक्षा दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाले असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे.

बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 04 मार्च 2022 ते 07 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाच्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलं होतं. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

राज्यातील शाळा-महाविद्यालये ऑक्टोबर 2021 पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती सह सुरू झाली आहेत. त्या अनुषंगाने उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक आणि तोंडी अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. covid-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षक कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!