ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटाचे टेन्शन वाढले : आंबेडकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिली ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून आता महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र देखील सुरु झाले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं होते. आता तर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत थेट ऑफरच दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एकीकडे ठाकरे गटासोबत युती केली आहे. मात्र आता आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांना सोबत येण्याचं आवाहन केल्याने ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडून आमच्यासोबत यावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सर्व मराठा समाजातील नेत्यांना बाजूला सारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मराठा समाजासाठी हिरो ठरले आहेत. एकनाथ शिंदेंबाबत मराठा समाजाची सहानूभुती वाढली आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे हे एक स्ट्राँग मराठा लीडर बनले आहे. त्यांनी सगळ्यांना क्लीन बोल्ड केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!