---Advertisement---

धक्कादायक : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली रोडरोमियोने छेड

By team
On: January 30, 2024 11:08 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी समजली जातेय. पण इथे आता महाविद्यालयीन तरूणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड काढत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पीडित तरूणी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकते. तिच्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरूणीने तिची छेड काढली आहे. छेडछाड करत बळजबरीने तिचा हात त्या तरूणाने धरला. हात धरून तिला कॉफी शॉपमध्ये नेलं. मात्र, यावेळी तरुणीने आपली सुटका करत घर गाठलं. या प्रकरामुळे पीडित तरूणी चांगलीच घाबरली होती. घडलेल्या प्रकारानंतर तिने धावतपळत घर गाठलं.

विशेष म्हणजे या घटनेतील रोडरोमियो तरुण गेल्या 2 वर्षांपासून तरुणीची छेडछाड करत आहे. तो अश्लील हावभाव करून पीडित तरुणीला त्रास देत आहे. सततचा त्रास असाह्य झाल्यामुळं पीडित तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. दरम्यान याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून रोडरोमिओ तरुणावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!