ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डिजिटल मिडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार

सावंतवाडीतील सुसज्ज "भोसले नॉलेज सिटी" हे संमेलन स्थळ : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, चंद्रकांतदादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण-राजा माने

मुंबई : प्रतिनिधी

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे तिसरे महाअधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी येथे होणार आहे.महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,कोकण विभागाचे अध्यक्ष सागर चव्हाण,प.महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, सचिव महेश कुगावकर,सहसचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य सहसंघटक तेजस राऊत,राज्य समन्वयक इक्बाल शेख,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे व अमोल पाटील यांची सावंतवाडी येथील ख्यातनाम संस्था ” भोसले नॉलेज सिटी” चे संस्थापक अच्युत भोसले यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीत महासंमेलन नियोजन व व्यवस्थापन या विषयावर चर्चा झाली.”पुस्तकांचे गाव” भिलार -महाबळेश्वर येथे पहिले ऐतिहासिक अधिवेशन झाले होते.त्या नंतर दुसरे अधिवेशन कोल्हापूर – कणेरी मठ येथे झाले होते.आता तिसरे महाअधिवेशन कोकणात होत आहे.या महा अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!