ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानचे कार्य समाजाला दिशादर्शक : आ.कल्याणशेट्टी
पुण्यतिथीनिमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राजकारणात कधी यश येते कधी अपयश येते.पण समाजकारणामध्ये काम करण्यात जो आनंद मिळतो.तो कशातच मिळत नाही.लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानचे सेवा कार्य हे गेल्या २६ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.हे निश्चितच समाजाला वरदान ठरणारे आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.शनिवारी, आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कुरनूर येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शेतकरी सन्मान सोहळा तसेच क्रीडा क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे आणि कल्याणशेट्टी परिवार यांचे संबंध हे फार पूर्वीपासूनचे आहेत.राजकारणामध्ये मतभेद झाले परंतु आम्ही कधीही सामाजिक कार्यापासून दुरावलो नाही.स्व.ब्रम्हानंद मोरे यांचा स्वभाव आणि त्यांचे कार्य या परिसराला सुपरीचित आहे म्हणून आज त्यांच्या पश्चात देखील त्यांच्या नावाने रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर,शेतकरी सन्मान सोहळे होतात आणि त्यांच्या आठवणींना यातून उजाळा दिला जातो या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष बाळासाहेब मोरे,कार्याध्यक्ष प्रमोद मोरे,विनोद मोरे आणि राजु मोरे हे चांगले कार्य करत आहेत.ते निश्चितच कौतुकास्पद आहे.यावेळी व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, माजी नगरसेवक महेश हिंडोळे,माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, स्वामीराव पाटील,प्रभाकर मजगे,मल्लिनाथ साखरे, ह.भ.प आबा महाराज कुरनूरकर,ह.भ.प बाबुराव शिंदे महाराज, केशव मोरे,ऍड. विजय हर्डीकर,
अमर पाटील,अभिजित पाटील,संजय मोरे,ऍड.फारीया टिनवाला आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरफिया टीनवाला यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याशिवाय गावात गेल्या अनेक वर्षांपासून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून चांगल्या पद्धतीने समाजाला दिशा दिल्याबद्दल सात शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सालाबादप्रमाणे गावातील गोरगरीब चारशे कुटुंबांना पाच किलो साखर वाटप करण्यात आले.दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये कुरनूर येथील दत्त मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये १०९ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन हत्तीकणबस येथील प.पू प्रभूशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विलास गव्हाणे,विश्वनाथ भरमशेट्टी,सिद्धाराम भंडारकवठे, तम्मा शेळके,प्रल्हाद जाधव आदींची
उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केले.कार्यक्रमासाठी चेतन मोरे,सतीश काळे,दयानंद काळे,ओंकार मोरे,सुमित शिंदे,सचिन दगडे,विष्णू खांडेकर आदींनी सहकार्य केले.
बाल कीर्तनकार माऊली महाराजांचे सुश्राव्य कीर्तन
यावर्षी प्रतिष्ठानच्यावतीने बाल कीर्तनकार माऊली महाराज काकडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.या कीर्तनामध्ये त्यांनी थोरांचे महत्त्व, संस्कार आणि अध्यात्म यावर प्रकाश टाकला. काकडे हे बाल कीर्तनकार असल्याने त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.ते खूप विनोदी कीर्तनकार असल्याने त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रति इंदुरीकर महाराज समजले जाते.