ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर भाजपला परवडणार नाही ; कॉंग्रेस नेत्याची प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला. यावर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

“ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे भाजपला परवडणारे नव्हते. त्यामुळे ते भाजपला होऊ द्यायचे नाही”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

ईडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर केले जाईल ही शंकाही व्यक्त होत होती. मात्र या भेटीगाठीने राज ठाकरे यांच्यावरच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. परंतु उद्धव ठाकरे सेना आणि मनसे युती होणार नाही अशी खेळी खेळली जात असल्याची शंका वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आता दोन भावांच्या युतीबाबत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!