ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर मी राजकारणातून संन्यास घेईल ; अजित पवारांच्या नेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणावरून मोठा वाद सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. आरक्षणला धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांच्या प्रचाराला प्रत्युत्तर दिले आहे. आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला तर मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा अधिकार नाही. म्हणूनच मी सर्वांचा त्याग करेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. या देशात आरक्षण हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. त्यामुळे आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही, त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नसल्याचे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांच्या वतीने आरक्षण काढून घेतले जाणार असल्याचा अपप्रचार करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक देखील त्याला भूलले. मात्र, आता लोकांच्या हे लक्षात आले आहे. आमच्यासारखे अनेक लोक जे संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेले आहेत. ते कधीही आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत देखील प्रफुल्ल पटेल यांनी आपले मत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, यावर आमचे सरकार ठाम असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल आहे. मराठा समाजाला विधानसभेत कायदा करून दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, काही लोकांना तेही पटत नाही. त्यामुळे ते विरोधाभास निर्माण करत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि इतर सर्व पक्ष इतकी वर्षे सत्तेत राहिले. मात्र, मराठा समाजाचा प्रश्न निकाली काढला नसल्याचा आरोप त्यांनी केला. वर्षानुवर्षी समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. ज्या समाजाच्या नागरिकांनी महाराष्ट्राचे अनेक वर्षे खंबीर नेतृत्व केले. मात्र, ते देखील मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नसल्याचे प्रफुल पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ टीका करायची, एवढे एकच काम विरोधी पक्ष करत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!