ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरच निवडणूक फिरेल ; प्रकाश आंबेडकर

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. निवडणूक याच्याच अवतीभोवती फिरेल व याच मुद्द्यावर लढवली जाईल अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे असे वक्तव्य जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी केले. सरकारला मराठा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळे द्यावे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

राज्यातील विविध आदिवासींना एकत्र करून चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन परिषद घेण्यात आली. यापूर्वी पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा असेल. याच्याच अवतीभवती निवडणुका लढल्या जातील अशी परिस्थिती असल्याचे सांगितले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न बेरोजगारी, महागाई, शेती आधारित किमती, शेतीमालाच्या किमती हे प्रश्न मागे पडलेले दिसत आहे यावर चर्चाही होत नसल्याचे ते म्हणाले.

ओबीसीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिल्याने व ती सोडवली नाही म्हणून तो कळीचा मुद्दा बनला आहे. जरांगे पाटलांची ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे यावर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही मात्र ओबीसी संघटनांनी भूमिका घेतलेली आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये अशी भूमिका घेतली आहे. त्याला आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे. ओबीसींचे आरक्षण ओबीसीलाच राहिले पाहिजे त्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करता कामा नये सरकारला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.

आरक्षणाचे राजकारण चालतच राहील मात्र काँग्रेस, एनसीपी, उबाठा व भाजपा हे चारही एका मुद्द्यावर कॉमन आहेत. आरक्षण कायमचे संपले पाहिजे याच मताचे हे चारही पक्ष आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. मात्र वंचित बहुजन आघाडी आरक्षण राहिले पाहिजे यासाठी लढत राहील आरक्षण वाचवण्याचे धोरण आमचे राहील. या निवडणुकीत पोलोरायझेशन होणार आहे. एक आरक्षणच्या बाजूला तर दुसरे आरक्षण संपले पाहिजे या बाजूला. ओबीसी फॅक्टर हे आरक्षण वाचण्यासाठी नेतृत्व करतील तर मराठा समाज आरक्षण विरोधात नेतृत्व करणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!