ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात राजकीय वाद रंगणार ; खा.लंके यांनी घेतली गजा मारणेची भेट

पुणे : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात गुंड असून त्याने नीलेश लंके यांची भेट घेतल्याने आता राजकीय वाद रंगणार आहे.
दरम्यान खासदार नीलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने नीलेश लंकेंचा सत्कार केला. नीलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते.

हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता… आता तुतारी गटाचे शालीन वक्ते कुठे दबले आहेत. ज्यावेळी पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली, त्यावेळी गदारोळ माजवला होता. त्यावेळी आजित पवारांनी चूक झाल्याचं मान्य केले होते. भेटायला नको होते, असे दादांनी सांगितले होते. आज नीलेश लंके सन्मानाने सक्तार स्वीकारत आहेत. बारामती अथवा अहमदनगर लोकसभामध्ये ज्या घडामोडी घडल्या, गुंडाचा वापर झाला, यामध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का ? हे तपासले पाहिजे.

कोण आहे गजा मारणे

गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!