ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे तर शिवसेना संपवण्यासाठी षडयंत्र : संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतिहास रचण्याची संधी गमावली असून ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सत्यवचनी प्रभू रामाचे नाव घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी निकालावर घणाघाती टीका केली. हे शिवसेना संपवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली, शिवसेना कोणाची हे भाजपची व्यक्ती ठरवणार का? असा सवाल करत राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, ठाकरेंच्या सेनेची अशी अवस्था करणे, एकप्रकारे अघोरी कृत्य आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला कधीही आणि कुणीही मागे खेचू शकणार नाही. उलट ही शिवसेना नव्या दमाने उभी राहत आहे. शिवसेना कोणाची आहे, हे कळायचे असेल तर निवडणूक घ्या, असे थेट आव्हान त्यांनी दिले. तसेच बंडखोर महाराष्ट्रद्रोह्यांना सत्यवचनी प्रभू श्रीरामाचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही या
निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांच्यावरही राऊत यांनी जोरदार टीका केली. तसेच विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेला संपवणे म्हणजे महाराष्ट्राला संपवण्यासारखे आहे. एका मराठी माणसाने म्हणजेच राहुल नार्वेकरांनी हे काम केले. एकनाथ शिंदे यांना असे हे मुख्यमंत्री पद लखलाभ असो, पण तुम्ही केलेले पाप हा अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अशी टीका राऊत यांनी केली. देशातील प्रादेशिकता संपवून देशात एकच पक्ष ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रापासून याची सुरुवात झाल्याचे सांगत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!