ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहा वर्षात आम्ही काय केले म्हणणाऱ्यांनी त्यांनी ४० वर्षात काय केले

आमदार कल्याणशेट्टी यांचा काँग्रेसला सवाल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आम्ही सत्तेत असताना दहा वर्षे काय केले असे म्हणणाऱ्यांनी मागच्या चाळीस वर्षात त्यांची सत्ता होती त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी काय केले, असा सवाल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बऱ्हाणपूर,पितापूर,कुरनूर, चुंगी येथे आयोजित कॉर्नर सभेच्या माध्यमातून नमो संवाद साधत ग्रामस्थांना विकासाचा विश्वास दिला. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, काँग्रेस दरवेळी प्रचारात तेच तेच मुद्दे सांगत आहे त्याला काही अर्थ नाही. मतदारांनी या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आम्ही दहा वर्षात चांगले रोड बनवले.ग्रामीण भागातील जनतेला पाण्याची सुविधा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत आहे. परराष्ट्रमध्ये भारताचे नावलौकिक आहे. मोदी सरकारने अनेक चांगले कायदे बनविले. सबका साथ सबका विकास हे भाजपचे धोरण आहे. अक्कलकोट तालुक्यात तर कोट्याधी रुपयाचा निधी देऊन तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे,असे कल्याणशेट्टी म्हणाले.या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन
त्यांनी जनतेला केला.

याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,अप्पासाहेब पाटील, अमोल हिप्परगी,खय्युम पिरजादे,शहीद पिरजादे,उबेद जहागीरदार, अश्रफ पटेल, मैनोद्दीन पटेल ,अमर पाटील, बाबा पटेल,असुदुल्ला पिरजादे, बाशा पिरजादे,इर्शाद फुलारी, हणमंत नागेशी,यूसुफ पटेल, इमाम पिरजादे, दिपक बनसोडे, राम इरवाडकर, राजकुमार झिंगाडे,रामा शिंगटे,आकाश माने आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!