ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रामलल्लाच्या दर्शनासाठी तीनशे कार्यकर्ते आस्था ट्रेनने रवाना

अक्कलकोट भाजपचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने अक्कलकोट मतदार संघातील तीनशे कार्यकर्ते अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी दीड हजार कार्यकर्ते आस्था स्पेशल ट्रेनद्वारे दर्शनासाठी रवाना झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत जय श्रीरामचा नारा दिला. शनिवारी सायंकाळी ७ वाजता सोलापूरहुनही ट्रेन अयोध्येकडे रवाना झाली.

यावेळी सोलापूर रेल्वे स्थानकावंर माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, सोलापूर जिल्हा महिला सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी,माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,शहराध्यक्ष शिवशरण जोजन, राजकुमार झिंगाडे, परमेश्वर यादवाड,प्रकाश पाटील,शिवलाल राठोड,प्रदीप पाटील,कांतू धनशेट्टी,दयानंद बमन्नळळी, रवी राठोड, बाळू चव्हाण,राजू बंदीछोडे,हुसेनी नंदिवाले, बसवराज मंटगी भीमा तोरणगी, महानंतेश पाटील,संदीप चव्हाण,आदी सह शेकडो कार्यकर्ते आस्था स्पेशल एक्सप्रेसने अयोध्या राम मंदिर दर्शनासाठी रवाना झाले.याप्रसंगी भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, महेश देवकर, सुशील क्षीरसागर,श्रीशैल हिरेपठ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राम भक्तांना निरोप देण्यासाठी उभे होते.रामभक्तांच्या उत्साहाला आलेले प्रचंड उधाण अपूर्व होते. रामनामाच्या घोषणानी आसमंत दुमदुमून गेला.

गुलाल, राममाळा, फुलपाकळ्यांनी उत्साहात आणखीनच भर पडली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये जे अशक्य ते शक्य करून दाखविले आहे आपल्या कार्यकर्त्यांनी आयोध्या नगरी पाहता यावी आणि त्या ठिकाणचे दर्शन घेता यावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे मिलन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. जिल्ह्यातून साधारण दीड हजार कार्यकर्ते ट्रेनने रवाना झाले असून या सर्व लोकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था उत्तर प्रदेश सरकारने केली असल्याची माहिती राजकुमार झिंगाडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!