अक्कलकोट : आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला “पूर्णब्रम्ह” म्हंटले आहे. याचे कारण असे कि, माणसाच्या जीवनातील मूलभूत गराजांमध्ये अन्नाचे प्रथम स्थान आहे. तसेच अन्न हे आपल्या शरीरातील पंच महाभूतांचे संरक्षण करते आणि त्यास चालना देते. अन्नाचे हे विशिष्ट स्थान आपण सारेच मानतो आणि अन्नाची पूजा देखील करतो.
जगभरात असे अनेक लोक आहेत जे अन्नाविना रोज एक-एक करून आपले प्राण सोडत आहेत. असे असताना देखील असे अनेक लोक आहेत जे उरलेले आणि शिळे अन्न फेकून देण्यास प्राधान्य देतात.
यात अनेकदा अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे ४०% अन्न वाया जाते. यात प्रामुख्याने चपाती शिळी झाल्यास न खाण्याचे प्रमाण अधिक आहे. पण शिळी चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. ऍसिडिटी असो किंवा पोटाची समस्या अश्या बऱ्याच आजारांवर शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे. म्हणूनच आम्ही शिळी चपाती खाण्याचे फायदे सांगणार आहोत.
★ काय आहेत फायदे?
● अशक्तपणावर आराम – शिळी चपाती खाल्यामुळे अन्न वाया तर जातच नाही. याशिवाय आरोग्याला अनेक फायडेसुद्दा मिळतात. अशक्तपणा जाणवत असेल तर शिळी चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. यासाठी दुधात कुस्करून चपाती खाणे फायद्याचे ठरते.
● उच्च रक्त दाबावर नियंत्रण – ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी शिळी चपाती फायदेशीर आहे. यासाठी सकाळी नाष्ट्यात थंड दुधासह शिळी चपाती खा. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
● मधुमेहींसाठी फायदेशीर – डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहींनी शिळी चपातीचा नाष्टा करणे फायदेशीर आहे. कारण रोज दुधासोबत शिळी चपाती खाल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.
● ऍसिडिटीपासून आराम – गॅस, ऍसिडिटी यासारख्या समस्यांवर त्वरित आराम मिळवायचं असेल तर सकाळच्या वेळी दुधासह शिळ्या चपातीचा सेवन करा. असे केल्यास ऍसिडिटी आणि अपचनाचा समस्या नियंत्रणात राहील.
● व्यायामासाठी फायदेशीर – शिळी चपातीत असणारे बॅक्टेरिया शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक ठरतात. यामुळे नियमित शारीरिक व्यायाम व कसरत करणाऱ्यानी शोल्या चपाती सेवन करणे उर्जादायी पर्याय आहे.