अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीत पारदर्शकता व योग्य दर मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन कृषि मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री स्वामी समर्थ व श्री शांतलिंगेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रंगनाथ कटरे व बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षणात बोलताना कटरे म्हणाले की, ई-नाम योजनेमुळे शेतमालाच्या बोलीसाठी राज्यातील इतर बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनाही संधी मिळणार असून त्यामुळे स्पर्धा वाढेल व चांगला दर मिळेल. मालाचे ग्रेडिंग, वजन, व्यवहाराची सुरक्षित नोंद यामुळे व्यवहारात पारदर्शकता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सातलिंगप्पा परमशेट्टी होते. सूत्रसंचालन सचिव स्वामीनाथ स्वामी यांनी केले.यावेळी उपसभापती सिध्दाराम बाके, संचालक मल्लिकार्जुन झळकी, विश्वनाथ नागुर, देवेंद्र बिराजदार, विश्वनाथ कोगनुर, मोतीराम राठोड, वहीदपाशा शेख, निंगप्पा पुजारी, सिध्दाराम तोळणुरे, रमेश पाटील, शिवानंद पाटील, इरण्णा दसाडे, चंद्रकांत येगदी, बाबु कोळी, सुवर्णा मचाले, अश्विनी सालेगाव आदी उपस्थित होते. दुधनी आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी, अंबण्णा निंबाळ, शिवानंद हौदे, शिवपादप्पा हौदे, जगदीश माशाळ यांच्यासह व्यापारी, आडते, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.