ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात दोन दुचाकीचा विचित्र अपघात : एक ठार तर एक गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी

भरधाव वेगात निघालेल्या दोन मोटरसायकलींच्या विचित्र अपघातानंतर मोटर सायकलस्वार एक तरुण रस्त्याच्या दुभाजकाला धडकून जागीच ठार झाला, तर दुसरा मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा भीषण अपघात मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सोलापूर- मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून ६ किलोमीटर अंतरावरील देगाव गाव परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक केगनाडे (वय२१, रा. देगाव, सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुदर्शन काळे (रा. देगाव, सोलापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक हा आपल्या ताब्यातील टीव्हीएस मोटारसायकलवरुन देगाव परिसरात निघाला होता. तर जखमी सुदर्शन काळे हा देखील भरधाव वेगात निघाला होता. अपघात झालेल्या त्याच्या मोटरसायकलला तोही जोरात धडकून जखमी झाला. दरम्यान, या विचित्र अपघातात अभिषेक वाहनावरून उडून खाली पडल्याने घसरत जाऊन रस्ता दुभाजकाला त्याचे डोके धडकले. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!