---Advertisement---

भयंकर : प्रेमी युगुलास निर्वस्त्र करीत लुटले

By team
On: May 15, 2024 9:42 AM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : वृत्तसंस्था

अरे चाललंय तरी काय…. प्रेमी युगुलास अडवून मारहाण केली आणि अंगावरून ९० हजारांचे दागिने काढून घेत नग्न करून फोटो काढण्याचा प्रकार बारामती येथील विमानतळानजीक घडला. आतापर्यंत प्रकारच्या दोन घटना घडल्या असून, त्यातील एकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. अलीकडे वाढत्या चोऱ्यांमुळे बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रेमी युगुलाचे कपडे उतरवून त्यांचे फोटो काढण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने बारामतीकर कमालीचे असुरक्षित बनल्याची नागरिकांची भावना आहे. पोलिसांची निष्क्रियता ठळकपणे समोर आली असून, एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

शुक्रवारी (दि. १०) एक युवती मित्रासह मोटारीतून विमानतळानजीक फिरायला गेली होती. त्या वेळी दोन अज्ञात चोरटे मास्क लावून आले, त्यांनी चाकूचा धाक दाखवीत युवतीच्या गळ्यातील चेन व कर्णफुले काढून घेतले. युवकाला त्यांनी दगडाने मारहाणही केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने निर्वस्त्र करून त्यांचे फोटो काढले. संबंधित युवतीने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका व्यक्तीसोबत घडल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी त्यांनाही बोलावून घेत चौकशी सुरू केली आहे. बारामतीत पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही, अशीच स्थिती गेल्या काही महिन्यांत घडली असून, वरिष्ठ अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत, तर काही अधिकारी-कर्मचारी निवडणुकीचे काम असल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!