अक्कलकोट तालुका प्रतिनिधी : नागनहळळी येथील आश्रमशाळेत उडगी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेचे अध्यक्ष संस्थेचे सचिव जावेद पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्रीमंत पुजारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गुरुव यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय मुख्याध्यापक रईस शेख यांनी केले होते.यावेळी श्री मल्लिकार्जुन प्राथमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन बसवराज गुरव, संचालक अमोल शिंदे, वासुदेव देसाई, शोभा स्वामी व शरणप्पा फुलारी यांचा सत्कार पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.शिक्षण परिषदेमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. लक्ष्मण वाघमोडे (मातनहळळी) यांनी जयंत नारळीकर व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सविस्तर माहिती देत वैज्ञानिक विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. लक्ष्मण म्हेत्रे (सातन दुधनी) यांनी निपुण भारत चाचणी बाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. वसीम मळ्ळी (बासलेगाव) यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान यासंदर्भात प्रभावी मार्गदर्शन करून जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. या शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा व विचारमंथन घडून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभूलिंग बशेट्टी,सूत्रसंचालन मोहन गुरव तर आभार संजय कवटगी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक मल्लिनाथ चिचोळी, काशिनाथ सालोटगी,दिगंबर नांदवटे, विश्वास डमरे यांनी सहकार्य केले.