दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते.
कोरोनातून बरे झाल्या नंतर (पोस्टकोविड) निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारावी परीक्षासंदर्भात आज होणारी बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.