---Advertisement---

पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर सकारात्मक चर्चा – अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ

Follow Us:
---Advertisement---

मुंबई :पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज महाधिवकत्यांची भेट घेणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, के.सी. पाडवी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!