ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर वसुलीसाठी जेऊर ग्रामपंचायतीचा अनोखा फंडा !

आठ दिवसांत दोन लाख रुपयांची वसुली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अनेकदा ग्रामपंचायतीने वारंवार दवंडी पिटवून किंवा जनजागृती करूनही ग्रामपंचायतीची कर वसुली होत नाही अशात अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने मात्र कर वसुलीसाठी यंदा अनोखा फंडा राबविला आहे.एप्रिल अखेर पर्यंत कर भरणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भव्य आकर्षक बक्षीस योजना जाहीर केल्याने वसुलीत भरघोस वाढ झाली आहे.जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पार्वती झंपले आणि उपसरपंच काशिनाथ उर्फ काका पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी सुरेश कोळी यांच्या प्रयत्नातून ही योजना जाहीर करण्यात आली आहे.याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत असून केवळ आठ दिवसात २ लाख वसुली झाली आहे.या योजनेमध्ये ग्लास घर,कप सट, ग्लास सट,थर्मास, झार, वजन काटा, इस्त्री, खुर्ची ,सँडविच मशीन, इंडक्शन तवा, टेबल फॅन ,सिलिंग फॅन, मिक्सर, हॉटपॉट,किचन सट, कुकर अशी अनेक बक्षीस ठेवण्यात आली आहेत.

कर थकीत असो किंवा चालू वर्षाचे असो. कर भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हमखास बक्षीस ठेवण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे या उपक्रमात मोठे सहकार्य मिळत असून या बक्षीस योजनेतून विक्रमी कर वसूली होईल,असे उपसरपंच काका पाटील यांनी सांगितले.

कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन

जेऊर ग्रामपंचायत मोठी आहे असे असताना त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी कर वसुली वेळेवर होणे देखील गरजेचे आहे. त्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी ही योजना केली आहे.यातून नागरिकांना देखील चांगल्या सुविधा देण्यास मदत होईल.

काका पाटील,उपसरपंच जेऊर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!