नव्या रूपात वंदेभारत लवकरच सेवेत रुजू होणार
भारतीयांचा ओव्हर-नाईट रेल्वे प्रवास आता अजून वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वंदेभारत या गाडीत 16 कोच आणि 823 बर्थ असतील : अकरा 3AC कोच, चार 2AC कोच आणि एक 1AC कोच असतील. या एक्सप्रेस गाडीमध्ये 611 थर्ड-एसी, 188 सेकंड-एसी आणि 24 फर्स्ट क्लास बर्थ असतील. ही ट्रेन युरोपीय गुणवत्ता मानकांनुसार जागतिक दर्जाची बनवण्यात आली आहे. यात मॉड्युलर टॉयलेट, मॉड्युलर पॅन्ट्री, डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षा कॅमेरे देखील आहेत. फर्स्ट क्लास एसी कोचेसमधील प्रवाशांसाठी गरम पाण्याच्या शॉवरचीही व्यवस्था आहे.
ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे आणि तिचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तास असणार आहे. या गाडीतत सेन्सर-आधारित लाइटिंग, इंटरकम्युनिकेशन डोअर्स आणि नॉइज इन्सुलेशन असेल. यात दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि स्वच्छतागृहे असतील. कोचमध्ये अविरत शुद्ध हवा प्रवाहित राहण्यासाठी ‘फोटो कॅटेलिटिक अल्ट्रा व्हायलेट एअर प्युरिफिकेशन प्रणाली’ बसविण्यात आली असल्याने हा प्रवास अतिशय अरामदायी होणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत देशातील पहिली ‘वंदे भारत – स्लिपर’ लवकरच येणार आहे.