अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विश्वनाथ भरमशेट्टी यांनी दिली.सोमवार दि.६ जानेवारी रोजी महादेव मंदिर येथे सकाळी १० वाजता अश्विनी ब्लड बँक सोलापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीराचे उदघाटन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील हे राहणार आहेत.तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी,माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड, पं.समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,अशपाक अगसापुरे,बाबा पाटील,प्रवीण शटगार,सरपंच व्यंकट मोरे, राजू चव्हाण,सिध्दाराम भंडारकवठे , बसवराज बाणेगाव,तुकाराम बिराजदार, सुनील बिराजदार आदींची उपस्थिती राहणार आहेत.
यावेळी मधुमेह व फुफुस तज्ञ डॉ.निलेश येळापुरे,हृदयरोगतज्ञ डॉ.बसवराज सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ईसीजी व रक्ततातील कोलेस्ट्रॉलची तपासणी होणार आहे.तरी या कार्यक्रमांना परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी प्रतिष्ठानचे अ ध्यक्ष वैभव भरमशेट्टी , उपाध्यक्ष रमेश छत्रे,सचिव गौरीशंकर भरमशेट्टी,ऍड.विशाल भरमशेट्टी,राजकुमार भरमशेट्टी,तिपण्णा हेगडे,बसवणप्पा सुतार, मनोज भरमशेट्टी,मिलन भरमशेट्टी,शब्बीर मुल्ला,सचिन बिडवे,चंद्रकांत जंगले,नरेंद्र जंगले,निरंजन हेगडे,परशुराम बाळशंकर आदी उपस्थित होते.