ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्या तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी

जनसेवक कै.आमदार बाबासाहेब तानवडे व लोकनेते कै. दत्ताअण्णा तानवडे पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट येथे गुरूवार दि.२५ जानेवारी रोजी कार्यकर्ता मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे व युवा नेते प्रसन्न तानवडे यांनी दिली आहे.बस स्टँड जवळील मल्लिकार्जुन मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.

आरोग्य शिबीर हे युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व तानवडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आले आहे.यासोबत दंत तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर पार पडणार आहे.यात सहभागी नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे.या शिबिरामध्ये डॉ.अभिजीत वडगावकर, डॉ. दिनेश कात्रे,डॉ. अभिजीत चिंचोळे,डॉ. सरिता अय्यर,दंत स्पेशालिस्ट डॉ. विवेक करपे, डॉ.अश्विनी करपे, डॉ. सायली भुजंगे, डॉ. ऐश्वर्या जकेतीया डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.आरोग्य शिबीर व दंत तपासणी हे समर्थ डेंटल स्पेशालिस्ट क्लिनिक शिवछत्रपती व्यापारी संकुल कांदा बजार येथे पार पडणार आहे.तालुक्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

यावेळी मेळाव्यास उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी,आमदार सचिन कल्याणशेट्टी, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, उद्योगपती रफिक मुल्ला, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, दुधनी बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, जिल्हा सरचिटणी अप्पू बिराजदार,माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,आप्पासाहेब पाटील,प्रभाकर मजगे,अविनाश मडीखांबे, सुरेखा होळीकट्टी, बाळासाहेब मोरे, तुकाराम बिराजदार ,परमेश्वर यादवाड, शिवसिद्ध बुळळा, दयानंद उंबरजे,उमेश पाटील,प्रभाकर मजगे,महेश पाटील, सिद्धाराम मठपती, चंद्रकांत इंगळे,परमेश्वर अरबाळे,दयानंद बमनळळी,महिबूब मुल्ला, दत्तात्रय माडकर आदिंसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.त्याशिवाय शिरवळ (ता. अक्कलकोट) येथेही बुधवार दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता श्री म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी (अक्कलकोट) व मातोश्री प.पू. जगदेवीताई भद्रेश्वर मठ यांच्या दिव्य सानिध्यात शि.भ.प महादेवीताई मठपती खैराटकर यांचे शिवकिर्तन होणार आहे.या कार्यक्रमास सरपंच आशाबाई बिराजदार, उपसरपंच मनीषा दूधभाते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.या सोहळ्याला कपिल महाराज,उमाकांत महाराज, दत्त महाराज (जालना) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशांत तानवडे व प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!