अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड.शरदराव फुटाणे (जाधव) यांनी दिली.
दरवर्षी ट्रस्टच्यावतीने जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील अक्कलकोट तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व गरजू व्यक्तींसाठी मोफत नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडणार आहे. प्रारंभी सकाळी १० वाजता सर्जेराव जाधव सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट संस्थांनचे श्रीमंत मालोजीराजे भोसले, तहसीलदार विनायक मगर, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.अध्यक्षस्थानी चेअरमन ऍड.शरद फुटाणे (जाधव) हे राहणार आहेत. नेत्र चिकित्सा शिबीर सकाळी ११ ते २ या वेळेत पार पडणार असून या शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.अनुराधा अवस्थी,डॉ.वीरेंद्र अवस्थी हे सहभागी होणार आहेत.यावेळी कार्यकारी विश्वस्त सुरेश फडतरे, शंकरराव पवार, शिवाजीराव पाटील, मोहनराव चव्हाण, परितोष जाधव,माधुरी जाधव, संतोष फुटाणे (जाधव) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.