ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आवक वाढल्याने भाज्यांचे दर झाले स्वस्त !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनके भाजी मंडईत रविवारी दि. 3 आवक वाढल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. सासवडवरून डिंगर्‍या (मुळ्यांच्या शेंगा) ची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डिंगरी 100 रुपये किलो दराने विक्री केली जात होती; तसेच कर्टुली 280 ररुपये किलो दराने विक्री केली जात होती.

वाटाणा, गवार शंभर रूपये किलो दराने विक्री केली जात आहे. गेल्या आठवड्यात मिरचीचा दर 100 रूपये किलो होता, तर रविवारी 60 रूपये किलो दर होता. पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत. पालेभाज्यांची जुडी 10 ते 15 रूपये दराने विक्री केली जात आहे. टोमॅटोचे दर 20 ते 25 रूपये वरून 50 रूपये किलो झाले आहेत. मालाची आवक वाढल्याने सर्व भाज्यांचे दर उतरले आहेत.

कांदे आणि बटाटे यांचे भाव मात्र स्थिर आहेत. शंभर रूपयांना पाच किलो कांदे व बटाटे विक्री केली जात आहे. फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत. कोथिंबीरची जुडी 10 – 15 रूपये तर पालेभाज्या 10 – 15 रूपये जुडी होत्या. फळभाज्यांमध्ये वांगी, दोडका, फ्लॉवर 60 रूपये किलो दर होता.

यामध्ये लसूण 100 – 140 रूपये किलो तर कांदा आणि बटाट्याचे दर शंभर रूपये 4 ते 5 किलो याप्रमाणे होते. टोमॅटो 50 रूपये प्रतिकिलो होते. आले 80 रूपये किलो आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे : रविवारी बाजारात गवार 120 – 140 रूपये किलो, शेवगा 80 रुपये किलो होता. वाटाणा 100 रूपये किलो, टोमॅटो 50 रूपये, भेंडी 60 रूपये किलो, फ्लॉवर 60 रूपये, कोबी 40 रूपये, मिरची 60 रूपये, गाजर 40 रूपये, शिमला 60 रूपये, लसूण 80 – 100 रूपये, आले 60 रूपये, वांगी 60 रूपये, काकडी 30 रूपये, कारले 30 , कांदे 100 रूपये 5 किलो, बटाटा 25 रूपये किलो, बिन्स 60 रूपये किलो, पावटा 40, रताळी 60 रूपये, लाल भोपळा 60 रूपये , घोसाळी 50, दोडका 40 – 50 रूपये, तोंडली 50 रूपये, बीट 40 रूपये, दुधी 50, घेवडा 60.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!