मुंबई : जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाला.मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कारबहोणार आहे. रमेश देव यांच्या निधनानंतर सिने सृष्टीतील मान्यवरांनी शोक व्यक्त केले आहेत. एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेता हरपला अशी भावना व्यक्त केले आहेत.
रमेश देव यांनी १९५१ मध्ये बाल कलाकार म्हणून पाटलाची पोर या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका केली. रमेश देव यांनी जवळपास २५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केले आहेत. त्यांना लाइफ टाईम अवॉर्डिअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
रमेश देव हे जेष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते. १९७१ साली आलेल्या आनंद आणि ताकदीर या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. आरती हा त्यांचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता. त्यांनी दिग्दर्शन आणि अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे.