---Advertisement---

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये मतदान कार्ड आधार कार्ड लिंक शिबिर

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा संघटन सरचिटणीस शिवशंकर स्वामी यांच्या माध्यमातून मतदान कार्ड आधार कार्ड लिंक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आमदार कल्याणशेट्टी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, हा उपक्रम लोकशाही मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे शिवशंकर स्वामी एक चांगला उपक्रम करत आहेत लोकांचा ही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.’ या कार्यक्रमात शेकडो आधार कार्ड लिंक करण्यात आले. या कार्यक्रमास आप्पासाहेब बिराजदार, अभिजित लोके, राजेश पडवळकर, सिद्धाराम उडचाण, मल्लिनाथ कुंभार, सुरेश वाले, दत्तात्रय शिंदे, रेहाना शेख, प्रमोद कलशेट्टी आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला अनिकेत लोके, सोमनाथ नंदिकोले, बसू कलशेट्टी, श्रीकांत क्यार, समर्थ बालके यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!